नाशिक – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बँकांनी ऑनलाईन कामावर भर दिला असून नियोजित ठराविक दिवशी बँका बंद ठेवण्यात येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने यासंबंधी पत्रक जाहीर केले आहे. तसेच नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगद्वारे बँकिंगची कामे पूर्ण करण्याचा सल्ला दिला आरबीआयने दिला आहे. बँकेच्या शाखेत जाऊन काम करणार असला तर ऑक्टोंबर महिन्यात २, १७, ३० आणि ३१ या तारखांना बँका बंद राहणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. तसेच शनिवार आणि रविवारी समाविष्ट करून ऑक्टोंबर महिन्यात दहा दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. ४, ११, १८ आणि २५ ऑक्टोबरला रविवार असल्याने नेहमीप्रमाणे बँका बंद राहणार आहेत. तसेच १० आणि २४ ऑक्टोंबरबरला अनुक्रमे दुसरा आणि चौथा शनिवार असल्याने त्यादिवशी बँका बंद राहणार आहेत.
—
अशा आहेत सुट्ट्या
२ ऑक्टोबर – गांधी जयंती / लाल बहादूर शात्री जयंती
१७ ऑक्टोबर – घटस्थापना
२५ ऑक्टोबर – दसरा ( रविवार )
३० ऑक्टोबर – ईद – ए – मिलाद