मुंबई – उर्जा मंत्री डॅा. नितीन राऊत यांनी महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कर्मचा-यांना बोनस देण्यास मंजुरी दिल्यामुळे दिवाळीतील संप टळला आहे.
ऐन दिवाळीच्या सणात राज्यामध्ये वीज गायब होण्याची चिन्हे निर्माण झाली होती. राज्यभरातील वीज कर्मचा-यांनी संपाची हाक दिली. त्यानंतर २५ संघटनांची ऑनलाईन बैठक ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतली. मात्र, या बैठकीत निर्णय न झाल्याने संपाची तलवार टांगती तलवार होती. पण, उर्जामंत्री राऊत यांनी बोनसची घोषणा जाहीर केल्यामुळे हा संप तूर्त तरी टळला आहे.
दिवाळीच्या सणाचा सानुग्रह अनुदान आणि पगारवाढीचा दुसरा हफ्ता द्यावा, अशी मागणी वीज कामगार संघटनांनी केली होती. त्यानंतर ठोस निर्णय झाला नाही तर येत्या १४ नोव्हेंबर पासून संपावर जाण्याचा इशारा वीज कामगार संघटनांनी दिला होता. त्यामुळे ऐन दिवाळीत राज्यात वीज गायब होणार अशी भीती होती. पण, बोनस जाहीर केल्यामुळे तूर्त तरी संकट टळले आहे…