नवी दिल्ली – भारताच्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये यावर्षी २६ जानेवारीला बांगलादेश सैन्याचा एक दल भाग घेणार आहे. ही राजपथवर होणाऱ्या भारताच्या सर्वात मोठ्या सोहळ्यात परदेशी सैनिक सहभागी होणाची दुसरी वेळ आहे.
दोन्ही देश जेव्हा बांगलादेशच्या निर्मितीचा सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहेत, अशा वेळी एका बांगलादेशी सैनिक गटाला परेडमध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे. बांगलादेश ऑर्डिनेन्स फॅक्टरी दरवर्षी १० हजारपेक्षा जास्त अशा प्रकारच्या रायफल तयार करते. २०१६ मध्ये पहिल्यांदा परदेशी सैन्याने भारताच्या परेडमध्ये भाग घेतला होता. जेव्हा १३० फ्रेंच सैनिकांचा समावेश असलेल्या तुकडीने राजपथवर कूच केली होती. यावेळी तत्कालीन फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सोइस ओलांडे हे मुख्य पाहुणे म्हणून परेडमध्ये उपस्थित होते.
यावर्षी कोरोना साथीमुळे कमी सैनिक दल सहभागी होतील आणि प्रेक्षकांच्या सर्वसाधारण संख्येपैकी केवळ एक चतुर्थांश लोक असतील. यावेळी केवळ २५ हजार पास दिले जात आहेत. इतकेच नव्हे तर सामाजिक अंतरामुळे मार्चिंग पथकाची सजावट व रचनादेखील बदलेल. यंदा १४४ सैनिकांऐवजी केवळ ९६ सैनिकांची पथके असतील. सहसा पथकात १२ आडव्या रांगा (पंक्ती ) आणि १२ उभ्या रांगा (स्तंभ) असतात. परंतु, यावेळी फक्त आठ पंक्ती असतील. कारण, सैनिकांमध्ये योग्य तफावत ठेवणे महत्वाचे आहे. या वेळी लहान मुलांचा समावेश पारडमध्ये होणार नाही. त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेमुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.