रक्तवाहिन्यांशी निगडित शस्त्रक्रिया करण्यामध्ये प्लास्टिक सर्जन्स हे पारंगत असतात. आज आपण जाणून घेणार आहोत ए. व्ही. फिश्चुलाशस्त्रक्रिया ह्या विषयाबद्दल.
हिमोडायलीसीसम्हणजेकाय ?
जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या दोघे किडन्या बंद पडतात, तेव्हा शरीरातील दुषित पदार्थ आणि पाणी बाहेर टाकले जात नाही. आणि या वस्तू शरीरात साठत जातात. परिणामी, छातीत पाणी होऊन पेशंटला दम लागणे, शरीराला सूज येणे असे विविध प्रकारचे त्रास उद्भवतात. हे सगळे दुषित पदार्थ रक्तातून बाहेर काढून रक्त शुद्ध करण्याच्या प्रक्रियेला हिमोडायलीसीस असं म्हणतात.
ए. व्ही. फिश्चुलाम्हणजेकाय? हेऑपरेशनकाकरूनघ्यावे ?
किडन्या निकामी झाल्याचे निदान झाल्यानंतर रुग्णाला वारंवार डायलीसीसची गरज पडते. डायलीसीस करण्याकरिता ए. व्ही. फिश्चुला हा सर्वात सोयीस्कर मार्ग आहे. डायलिसिस करण्यासाठी पुरेशा दाबाने रक्त डायलायझर मशीन मध्ये जाऊन ते शुद्ध करून तेवढ्याच दाबाने शरीराच्या आतमध्ये परत सोडले जाते. या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी आपल्याला अशी रक्तवाहिनी लागते जिच्यामधून पुरेश्या दाबाने रक्त वाहते. त्याला आपण High flow vessel असं म्हणूया. शरिरामध्ये नीला म्हणजेच व्हेन्स ह्या त्वचेच्या खाली लगेचच सापडतात परंतु त्यांच्यामध्ये पुरेश्या दाबाने रक्त वाहत नाही. या उलट धमणी म्हणजेच आर्टरी ह्या पुरेश्या दाबाने रक्त वाहून नेतात परंतु त्या शरीरात खोलवर असल्यामुळे त्यांच्यामध्ये वारंवार डायलिसिस साठी सुई टाकणे थोडे अवघड होते. यावर साधा तोडगा म्हणजे त्वचेखाली असलेल्या निलांना धमनीशी जोडून त्यांच्यामध्ये रक्तदाब वाढविणे. ह्या दोघे रक्तवाहिन्या विशिष्ठ प्रकारे एकमेकांना जोडण्याच्या प्रक्रियेला ए. व्ही. फिश्चुला सर्जरी असं म्हटलं जातं. ( A : Artery V : Vein , Fistula : दोन नलिकांमध्ये असणारे कनेक्शन.)
हेऑपरेशनकेव्हाकेलंजावं ?
किडनी विकार तज्ज्ञांनी रुग्णाच्या दोघे किडन्या निकामी झाल्याचं कळवल्यानंतर , बहुतांशी रुग्णांना ए. व्ही. फिश्चुला शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून डायलिसिसची गरज पडेल तो पर्यंत हा फिश्चुला परिपकव ( mature ) झालेला असतो.
डायलिसिस चालू असणाऱ्या रुग्णांमध्ये जर ए व्ही फिश्चुलाचे ऑपरेशन करावयाचे असेल तर साधारणपणे डायलिसिस च्या दुसऱ्या दिवशी ते केलं जात.
हेऑपरेशनशरीराच्याकुठल्याभागावरकेलंजातं ?
सर्वसाधारणपणे हाताच्या मनगटाजवळ किंवा कोपराजवळ हे ऑपरेशन केलं जात. ( Left wrist —> elbow —> right wrist —> elbow )
जर दोघे हातांच्या मनगट आणि कोपरा वरील फिश्चुला करून ते बंद झाले असतील तर Basilic Vein transposition नावाचे एक ऑपरेशन करून आपल्याला त्यातून डायलिसिस करता येऊ शकते. यामध्ये हाताच्या आतल्या बाजूला खोलवर असणाऱ्या रक्तवाहिनीला त्वचेखाली आणून हे फिश्चुलाचे ऑपरेशन केले जाते.
ह्या पर्यानंतर सुद्धा आपल्याला कृत्रिम रक्तवाहिनीच्या द्वारे डायलिसिस करता येऊ शकते. ह्या ऑपरेशनला ए व्ही ग्राफ्ट सर्जरी असं म्हटलं जातं.
ऑपरेशनच्याआधीकायतयारीकरावी ?
डॉक्टरांनी सांगितल्यास हाताच्या रक्तवाहिन्यांची डॉपलरची तपासणी आणि रक्ताच्या काही विशिष्ठ तपासण्या करून घ्याव्या. एका बाजूच्या हाताला (सर्वसाधारणपणे डावा हात, कारण बहुतेक लोक उजव्या हाताने काम करतात)
कुठल्याही प्रकारचे इंजेक्शन देणे,
सुया टोचणे,
रक्त घेणे अथवा देणे,
सलायीन लावणे किंवा
त्या हातावर ब्लडप्रेशर चेक करणे टाळावे.
त्या हाताने बॉलचे व्यायाम सुरु करावा. व्यायाम केल्याने रक्तवाहिन्यांचा आकार विस्तृत होऊन ऑपरेशन करणे सोपे तर जातेच परंतु ते दीर्घकाळ टिकण्यासही मदत होते.
ऑपरेशनच्या दिवशी हात साबणाने स्वच्छ धुवून हॉस्पिटलला यावे.
हातातील बांगड्या, अंगठी, व इतर गोष्टी घरीच काढून ठेवाव्यात.
ऑपरेशनला येताना हलका नाश्ता करून यावा.
डायबेटीस व ब्लड प्रेशरची औषधे नेहमीप्रमाणेच घेऊन ऑपरेशन साठी यावे.
आपण जर रक्त पातळ होण्याची औषधं घेत असाल तर त्याची पूर्वकल्पना प्लास्टिक सर्जनना देणं गरजेचं आहे. अश्या स्थितीमध्ये ती औषधं ४ ते ५ दिवस बंद करून आवश्यकता भासल्यास विशिष्ठ इंजेक्शन्स चालू करून मग ए. व्ही. फिश्चुलाचे ऑपरेशन केलं जातं , आणि ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवसानंतर हि औषधं पूर्वीप्रमाणेच नियमित घेतली जाऊ शकतात.
ऑपरेशनची जागा बधीर करून ( ज्याला आम्ही लोकल ऍनेस्थेशिया असं म्हणतो ) रक्तवाहिन्यांना जोडण्याचे हे किचकट ऑपरेशन सूक्षम्दर्शिकेच्या साहाय्याने केले जाते. ऑपरेशन करताना पेशंटला एक ते दिड तास पाठीवर झोपावे लागते. त्यामुळे ऑपरेशनच्या आधी दम लागत असल्यास अथवा पाठीवर झोपता येत नसल्यास तशी पूर्वकल्पना आधी डॉक्टरांना द्यावी.
ऑपरेशन केल्याच्या ३ ते ४ तासानंतर रुग्णाला घरी सोडले जाते.
फिश्चुलाचेऑपरेशनझाल्यानंतरकायकरावे ?
फिश्चुलाचे ऑपरेशन झाल्यानंतर हात खाली लोम्बकळत ठेवू नये.
झोपताना हात हृदया पेक्षा वरील उंचीवर २-३ उशांवर ठेवावा.
ऑपरेशन झाल्यानंतर ४-५ तासानंतर बॉलचे व्यायाम सुरु करावेत. ते केल्याने फिश्चुला लवकर परिपक्व (Mature) होण्यास मदत होते. साधारणपणे स्व्कीझ बॉल हा पटापट दहा वेळा दाबून सोडावा. असा व्यायाम दिवसातून ८ ते १० वेळा करावा. याव्यतिरिक्त कपडे वळत घालण्याच्या पिनांची उघडबंद पण अशाच पद्धतीने करावी.
मनगटाजवळ ए. व्ही. फिश्चुलाचे ऑपरेशन केले असल्यास मनगट डोक्याखाली (सवय असल्यास) ठेवले जाऊ नये याची काळजी घ्या, अन्यथा फिश्चुलावर दाब येउन तो बंद पडेल.
हाताच्या कोपराजवळ फिश्चुलाचे ऑपरेशन केले असल्यास वरील व्यायामाव्यतिरिक्त साधारण १ किलो वजन अथवा वजनाचे समान घेऊन हात कोपरातून वर खाली करावा. असे दिवसातून ८ ते १० वेळा आणि प्रत्येक वेळी १० मिनटे हा व्यायाम करावा. जास्त वेळेसाठी कोपर दुमडून ठेवणे टाळावे.
ऑपरेशन झालेल्या हाताभोवती आवळणारे घट्ट कपडे, दागिने , बांगड्या ऑपरेशननंतर घालू नयेत, तसंच ऑपरेशन झालेल्या हाताने खूप जड सामान उचलू नये. त्या हातावर कुठल्याही प्रकारचे इंजेक्शन देणे, सुया टोचणे, रक्त घेणे अथवा देणे, सलायीन लावणे टाळावे. त्या हातावर ब्लडप्रेशर चेक करणे टाळावे.
ऑपरेशनचेसंभाव्यकॉम्प्लिकेशन्स :
ऑपरेशनच्या जागेतून रक्तस्त्राव होणे.
ऑपरेशनच्या जागेवर पस (इन्फेक्शन) होणे.
हातावर सूज येणे, बोटे काळी निळी पडणे अथवा बोटांवर जखमा होणे. यापैकी काहीही जाणवल्यास त्वरित जवळच्या दवाखान्यात दाखवावे.
कधी कधी ऑपरेशनच्या जागेवर रक्ताची गाठ अडकून फिश्चुलाचे ऑपरेशन निकामी (फेल) होते. (डायबिटीस, रक्तात कोलेस्ट्रॉल जास्त असणाऱ्या व्यक्ती किंवा ज्यांच्यामध्ये रक्तवाहिन्यांचा आकार खूपच कमी आहे अश्या व्यक्तींमध्ये ह्याचे प्रमाण जास्त असते. )
साधारणतः १२ ते २० टक्के लोकांमध्ये फिश्चुला हा एकतर फेल होतो किंवा तो हवा तसा mature होत नाही. अश्या वेळेस दुसरा फिश्चुला बनवून घेणं किंवा इतर पर्यायी मार्ग अवलंबवायची गरज पडू शकते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!