नाशिक – उत्तर महाराष्ट्रातील युवती आणि महिलांना सौंदर्यशास्त्राचे सखोल आणि शास्त्रोक्त प्रशिक्षण मिळावे, यासाठी नाशिकमध्ये एसेल्स इंटरनॅशनल ब्युटी स्कूलचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची सिटी अँण्ड गिल्ड्स या संस्थेचे एसेल्स इंटरनॅशनल संलग्न आहे. केवळ स्थानिकच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांना करिअरची संधी उपलब्ध व्हावी यासाठी ब्युटी स्कुलची सुरुवात करण्यात आल्याचे मत संस्थापक संचालिका मिसेस पाटोळे यांनी यावेळी व्यक्त केले.
उत्तर महाराष्ट्रात केवळ नाशिकमध्ये प्रथमच एसेल्स इंटरनॅशनल ब्युटी स्कूल कार्यरत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. इंदिरानगर येथील मुख्यालयात प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. सौंदर्यशास्त्र ही देशातील देदिप्यमान परंपरा लाभलेली शाखा असून त्यात काळानुरूप बदल होत आहेत. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचे मत पाटोळे यांनी व्यक्त केले. देशभरात सौंदर्यशास्त्रात मोठी क्रांती होत असतांना नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील आधुनिक जीवनशैलीचा अंगीकारणार्या महिला विश्वाला सौंदर्याशी संबंधित शास्त्रोक्त माहितीचे व्यापक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी एसेल्स इंटरनॅशनल ब्युटी स्कूलची पायाभरणी करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. या माध्यमातून युवती व महिलांना ब्युटी थेरेपी क्षेत्रातील सखोल आणि शास्त्रोक्त शिक्षण देण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. व्यवसायभिमुख शिक्षण, आवश्यक शैक्षणिकस्नेही वातावरण, प्रात्यक्षिके, तज्ञ व अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन याद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
दहा श्रेणींमध्ये अभ्यासक्रम
पदविका श्रेणीत इंटरनॅशनल ब्युटी थेरेपी, इंटरनॅशनल हेअर ड्रेसिंग, मास्टर इन कॉस्मेटॉलॉजी, प्रोफेशनल ब्युटीशियन्स डिप्लोमा कोर्स, सर्टिफिकेशन इन कॉस्मेटिक मेकींग, ऍडव्हान्स पंचकर्म इन स्पा, मेकअप आर्टिस्ट कोर्स, इंटरनॅशनल हेअर स्टायलिंग, नेल आर्ट कोर्स आणि सलून मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.
काय आहे सिटी अँड गिल्ड्स ?
सौंदर्य शास्त्रातील अत्युत्तम अभ्यासक्रमांद्वारे जागतिक दर्जाचा संस्था म्हणून ओळखली जाते. ही संस्था १४२ वर्षापासून कार्यरत असून सहा खंडांमधील सुमारे २१० देशांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेच्या सुमारे १० हजार प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
ब्युटी थेरेपिस्ट
एसेल्स इंटरनॅशनल ब्युटी स्कूलच्या संस्थापक संचालिका ललिता पाटोळे यांच्याकडे सौंदर्यशास्त्र अभ्यासाचा तब्बल २५ वर्षांचा अनुभव आहे. ब्युटी थेरेपिस्ट म्हणून ख्याती असलेल्या ललिता पाटोळे यांनी पदव्युत्तर शिक्षण स्किन कॉस्मेटॉलॉजी, नॅचरोपॅथी व अक्युपंक्चर या विषयांमध्ये पूर्ण केले आहे. सौंदर्यशास्त्र विषयाशी निगडीत उपक्रम राबवताना युवती व महिलांमध्ये कार्यशाळांच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे काम ते करतात.
सौंदर्य शास्त्राचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. त्यासाठी तज्ञ व अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन वेळोवेळी देण्यात येईल. उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदा नाशिकमध्ये संस्थेची मुहूर्तमेढ होत असल्याचा आनंद आहे.
– ललिता पाटोळे, संस्थापक संचालिका
Fees Kay ahe ma’am…
Ani admission Kashi ghychi.