नाशिक – महात्मा गांधी विद्यामंदीर संचलित औषधनिर्माणशाश्त्र महाविद्यालय, पंचवटी नाशिक येथील कु. आकांक्षा शिंदे , कु. सोनाली दरेकर व डॉ. सुवर्णा कट्टी यांनी ‘हाकेथॉन इनो फेस्ट -२०२१ ‘ घवघवीत यश संपादन करून ३ लाख रुपयांचे बक्षीस मिळवले.
देशातील तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा व्यवसायाकडे वळावे या उद्देशाने देशात सुरू करण्यात आलेल्या स्टार्टअप इंडिया या योजनेला विविध स्तरांतून प्रतिसाद मिळत असतानाच राज्यात एकूण २२ स्वायत्त कॉलेजांमध्ये इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेल उभारण्यात आले आहेत.देशातील तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा व्यवसायाकडे वळावे या उद्देशाने देशात सुरू करण्यात आलेल्या स्टार्टअप इंडिया या योजनेला विविध स्तरांतून प्रतिसाद मिळत आहे.
याचाच एक भाग म्हणून पुणे विद्यापीठाने पुढाकार घेत ‘हाकेथॉन इनो फेस्ट -२०२१ ‘ ही स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ व पिंपरी चिंचवड महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली. त्यात विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला. यात तीन फेरी घेण्यात आल्या. यामध्ये आज दि. ६ मार्च २०२१ या दिवशी जी अंतिम फेरी झाली. त्यात आपल्या महाविद्यालयाच्या बीफार्म ची कु. आकांक्षा शिंदे , एमफार्म ची कु. सोनाली दरेकर व त्यांच्या शिक्षिका डॉ. सुवर्णा कट्टी या सहभागी झाल्या होत्या. त्यात त्यांनी घवघवीत यश संपादन करून ३,००,०००/- बक्षीस मिळवले.
” सुलभ शौचालयाचा प्रभावी वापर व देखभाल” या विषयावर त्यांनी प्रात्यक्षिकासह सादरीकरण केले. पहिल्यांदा ऑनलाईन नोंद करून सादरीकरण झाले . याच महाविद्यालयातील यांच्या सोबतच तीन ग्रुप त्यात सहभागी झाले होते. शेवटच्या फेरी पर्यंत सर्व महाविद्यालयाचे मिळून दहा ग्रुप निवडले होते. त्या मध्ये या विद्यार्थिनींनी बाजी मारली.
हा प्रयोग पिंपरी चिंचवड महानगर पालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे. तीन लाख रुपये हा निधी या प्रयोगासाठी वापरण्यात येणार आहे. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन कळमळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.
यावेळी उप- कुलगुरु मा. डॉ. एन. एस. उमराणी, इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेल च्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, मुख्य माहिती अधिकारी कोमन, आयुक्त राजेश पाटील हे उपस्थित होते.
संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांत हिरे, संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे, सहसचिव डॉ. व्ही.एस.मोरे, महाविद्यालयाच्या सीडीसी कमिटीचे अध्यक्ष राजेश शिंदे यांनी ही संधी पहिल्यांदा फार्मसी महाविद्यालयाला मिळाल्याबद्दल त्यांनी कु. आकांक्षा शिंदे , कु. सोनाली दरेकर, डॉ. सुवर्णा कट्टी व प्राचार्य डॉ. राजेंद्र भांबर यांचे अभिनंदन केले.