नाशिक – एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन प्रकरणी नाशिकच्या सहायक कामगार आयुक्तांची एसटी महामंडळाला नोटीस दिल्यामुळे खबबळ निर्माण झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांचे वेतन अदा न केल्याप्रकरणी ही चौकशीची नोटीस आहे. चौकशीत एसटी कर्मचाऱ्यांना वेतन अदा न केल्याचं सिद्ध न झाल्यास कायदेशीर कारवाईचा करण्यात येणार आहे. ९ तारखेला एसटीच्या विभागीय व्यवस्थापकांना बैठकीत सक्षम कागदपत्रांसह हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहे. महाराष्ट्र एसटी वर्कर्स कँाग्रेस (इंटक) ने याबाबात तक्रार केली आहे.