नाशिक – एसएसके हाॅटेलमध्ये टेबल बुकिंगच्या कारणावरुन हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहे. ग्राहक व हॅाटेल व्यवस्थापनाने एकमेकांविरुध्द तक्रार केली आहे. या घटनेत ग्राहक अजय विक्रम भालेराव (वय २९) रा. शुभारंग रेसीडेन्सी अशोका मार्ग यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भालेराव यांच्या तक्रारीनुसार, ते रविवारी (ता.२४) रात्री साडे नउच्या सुमारास एसएसके हाॅटेल मध्ये जेवायला गेले असता तेथे टेबल बुकींगवरुन हाॅटेल मालक कुटे व व्यवस्थापक अविनाश यांनी १० ते १५ जण जमवून बेस बाॅल स्टिकने मारहाण करीत ३० हजाराची सोन्याची साखळी ५० हजाराचा आयफोन असा सुमारे ८० हजाराचा ऐवज बळजबरीने काढून घेत बहिणीचे कपडे फाडले अशी तक्रार दिली आहे.
तर हाॅटेलचे व्यवस्थापक अविनाश दिलीप देशमुख (वय ३२, श्रमिक हौसींग सोसायटी, माणिकनगर ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अजय विक्रम भालेराव, एम रामकृष्णन, शिवा अस्वले आदीनी
टेबल बुकिंगच्या शुल्लक कारणावरुन हाॅटेल मालक शैलेश कुटे, रेस्टाॅरंट मॅनेजर राम कटारे यांना लाथाबुक्यानी मारहाण करीत, गेस्ट रिलेशन मॅनेजरला अश्लील हावभाव करीत व्यवस्थापकाच्या खिशातून १५ हजार रुपये काढून घेतल्याचे तक्रार केली आहे.या तक्रारीवरुणही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण शिंदे हे करीत आहे.