येवला – येथील एसएनडी.अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षात शिकणा-या स्वाती सरदार या विद्यार्थिनीची लोकसेवा आयोगा मार्फत सहायक आरटीओ पदावर नियुक्ती झाली आहे. बुधवारी प्रतिक्षा यादी जाहीर झाली असून यात तीचे नाव आल्याने तीच्या आनंदाला पारावार उरला नाही.
मनमाड येथील रहिवाशी असलेल्या स्वातीने नांदगाव येथे पॉलिटेक्निकची पदवी घेतल्यानंतर तिने येथील एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात प्रवेश घेतला. सध्या ती अंतिम वर्षात शिकत आहेत. २०१७ मध्ये तिने पॉलिटेक्निकच्या पदवीवरून आरटीओ पदासाठी लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. २०१८ मध्ये आलेल्या निकालात ती उत्तीर्णही झाली. पण तीन गुणांनी तिची नियुक्तीची संधी हुकली होती. संधी हुकल्याने पुन्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून ती सध्या अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षामध्ये शिकत असून याच दरम्यान तिचा केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास देखील सुरु आहेत.
पण याच दरम्यान तिला आज लोकसेवा आयोगाकडून आनंदाची वार्ता समजली अन तीचा स्वप्नपूर्तीला बळ मिळाले.आज प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची सहाय्यक आरटीओ पदासाठीची नियुक्तीची यादी जाहीर केली असून या यादीत ३२ व्या क्रमांकावर तिचे नाव आले आहे. दोन वर्षानंतर नियुक्ती मिळेल असे किंचितही वाटले नव्हते. मात्र आज अचानक झालेल्या नियुक्तीने खूप मोठा आनंद मिळाला आहे.यापुढे पुन्हा परीक्षा देऊन पोलीस निरीक्षक पदापर्यंत जाण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. या पदावर अचानक नियुक्तीचा योग आल्याने हा आयुष्यातील सर्वात मोठा आनंद असल्याची प्रतिक्रिया तिने व्यक्त केली.
प्रतिक्षा यादीतून गुणवत्तेनुसार शासनाच्या मागणीस अनुसरून उमेदवारांची शिफारस करण्यात येत असल्याचे नियुक्ती आदेशात म्हटले आहे.एस.एन.डी. महाविद्यालयात तीच्या नियुक्तीचा आनंदोत्सव साजरा झाला. यावेळी संस्थेचे संचालक रुपेश दराडे, प्राचार्य डॉ. हरी कुदळ, यंत्र विभाग प्रमुख डॉ. के.जी.मणियार, प्रा.व्ही.आर.ठाकरे, प्रा. एस.जी.सावंत, प्रा.ए.पी.घोडके, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. एस. साधवाणी. ए.एच.करवंदे, ए.पी.घोडके, एम.एस.देशमुख, टी.व्ही.गुजराथी, डी.पी. थोरात, एच.आर.आहेर, पी.एस.बारवकर, एस.एस.आहेर, आर.एच.परदेशीं, बी.एस डांगे, के.आर.कुंभार्डे, ए.एस. औताडे, एस.ए.धरम, डी.जि.उगले व्ही. यू.साबळे, निलेश चौधरी, ज्ञानेश्वर मोहीम यांच्यासह सर्व शिक्षकांनी स्वातीचे अभिनंदन केले.