मुंबई – दिवाळीनंतर ९वी ते १२वीचे वर्ग सुरू केले जाणार असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. तशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
अशी घेतली जाणार खबरदारी
- शाळा सुरू करण्यापुर्वी जिल्हा प्रशासन व महापालिकेद्वारे शिक्षकांची आरोग्य तपासणी
- केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करणार
- ४० मिनिटांचे चार तासच शाळा होणार
- सूचनांचे पालन होते आहे की नाही याची तपासणी संबंधित अधिकारी करणार
- खुल्या मैदानावर, मोकळ्या जागेत तसेच खेळत्या हवेच्या वर्ग घेण्यास मुभा
- स्थानिक प्रशासन, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, व्यवस्थापक व सरकार यांची सामुदायिक जबाबदारी राहणार
- एक दिवस आड विद्यार्थी शाळेत येणार
- शिक्षक व विद्यार्थ्यांना मास्क बंधनकारक
- कुटुंबातील सदस्य आजारी असल्यास किंवा विद्यार्थी आजारी असल्यास त्यांनी शाळेत येऊ नये
- ऑनलाईन शिक्षणातील उजळणी, शंका-समाधान व नवा विषय शाळेत शिकविला जाईल