नाशिक – एमसीए या अभ्यसक्रमाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यसक्रमाच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परिक्षा (सीईटी) अनिवार्य असुन राज्य शासनातर्फे ही प्रवेश परिक्षा घेतली जाणार आहे. सीईटी देण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असुन, इच्छूक विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा
अर्ज भरण्यासाठी दिनांक ०७ व ०८ सप्टेंबर २०२० रोजी (२ दिवस) एक विशेष बाब म्हणून संधी देण्यात येत आहे.
अर्ज भरण्यासाठी https://info.mahacet.org/cet2020/MCA2020 या पोर्टल वर भेट देण्यात यावी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातर्फे एमसीए हा अभ्यासक्रम तीन वर्षाऐवजी दोन वर्षांचा करण्यात आला आहे. एमसीए शिक्षणक्रमानंतर विद्यार्थ्यांना आईटीसह इतर क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांनी विहीत मुद्तीत ऑनलाईन अर्ज करावेत.
ऑनलाईन अर्ज व प्रवेश परीक्षेविषयी डॉ. मुंजे इन्स्टिटयूट मध्ये मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आल्याची माहिती इन्स्टिटयूटचे अध्यक्ष राहुल वैद्य आणि संचालिका डॉ. प्रिती कुलकर्णी यांनी दिली आहे. व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य आहे. एमसीए या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एकच सीईटी परीक्षा घेण्यात येते. त्यामुळे एमसीए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य असते.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी https://info.mahacet.org/cet2020/MCA2020 या संकेतस्थळावर अर्ज करून परीक्षा देणे अनिवार्य आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ या परीक्षेसाठी ही शेवटची संधी उपलब्ध झाली आहे. सीईटी देणारे विद्यार्थी शासनाच्या विविध सवलती व शिष्यवृतीसाठी पात्र होतात.
डीजीटल भारत, स्मार्ट शहरांमुळे आयटी क्षेत्रात अनेक संधी निर्माण होत आहेत. हार्डवेअर, साँफ्टवेअर, गूगल, अॅपल, मायक्रोसॉफ्ट, यासारख्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होत असल्याची माहिती यावेळी उपसंचालक डॉ. श्रीराम झाडे यांनी दिली. अधिक माहिती साठी डॉ. मुंजे इन्स्टिटयूटचे प्रा. राजेश्वरी रसाळ-9175927050/9823284482 व प्रा. महेश कुलकर्णी 9890150760 9175947050 यांच्याशी संपर्क साधावा.