ग्राहक मित्रांनो,
आपण औषध विकत घेतो तेव्हा एमआरपी प्रमाणे पैसे देतो. ग्राहकांना वाटते की चला आपल्याला फसवले गेले नाही आपल्याकडून जास्त पैसे घेतले नाहीत. एमआरपी कायदा येण्या अगोदर किती टॅक्स लागतो हे ग्राहकाला कळायचे नाही त्यामुळे औषधाच्या किमती या निश्चित नसायच्या आणि ग्राहकाकडून टॅक्स पोटी वेगवेगळे आकार घेतले जात. त्यामुळे एमआरपी कायदा आला की ज्यात सर्व टॅक्स, ट्रान्सपोर्ट खर्च तसेच स्टॉकिंस्ट, डीलर, दुकानदार ह्यांचे सर्व कमिशन आणि फायदा हे सर्व धरून चार्जेस आकारले जातील. असे वाटले आता ग्राहकांना योग्य किमतीत सर्व माल तसेच औषधे मिळतील. पण एमआरपी कायदा आल्यावर पण त्याचा गैर फायदा इतर कंपनी बरोबर फार्मा कंपन्यानी पण घ्यायला सुरुवात केली आणि एमआरपी ही मनमानी पद्धतीने पद्धतीने छापणे सुरू झाले. सरकारी अधिकारी वर्गाला हाताशी धरून किमती ठरवू लागले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतची फार पूर्वी पासूनची मागणी आहे की एमआरपी हटवा आणि मूळ उत्पादन मूल्य छापा आणि हवी ती किंमत ग्राहकाकडून घ्या पण सरकारने अजून पर्यंत ती मागणी पूर्ण केली नाही. आज ग्राहक बाजारात जातो तर तिथे किती तरी औषधे ही एमआरपी पेक्षा ३०% कमी किमतीला घेऊन येतो.
कित्येक ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या कंपनी या ३०% ते ४०% कमी किमती मधे औषध विक्री करत आहेत कारण एमआरपी ही कितीही छापली जाते आणि सरकारी औषध निरीक्षक हे फार्मा कंपनीला त्यात मदत करत आहेत हे अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे लक्षात आले आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतने आता सर्व सरकारी औषध निरीक्षक आणि अधिकारी वर्ग यांचे वर लक्ष केंद्रित केले आहे. तरी सर्व ग्राहकांना विनंती की आपल्या भागातील सरकारी औषध निरीक्षक तसेच सरकारी अधिकारी यांनी काही अवैध संपत्ती जमा केली आहे का याची माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे द्यावी.
अशी माहिती देणाऱ्या ग्राहकाचे नाव गुप्त ठेवले जाईल. तसेच सदर माहिती मिळाल्या नंतर याबाबत योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल त्यात अशा अधिकारी, निरीक्षक यांची माहिती लोकपाल यांना दिली जाईल, त्यांची तक्रार ही केंद्रीय दक्षता आयोग (सेन्ट्रल विजिलन्स कमिशन) कडे दाखल केली जाईल. वेळ पडल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका ही दाखल केली जाईल.
आपण पण ग्राहक म्हणून याबाबत केंद्रीय दक्षता आयोग कडे स्वतः होऊन तक्रार दाखल करू शकता अगदी आपल्या कडील स्मार्ट फोन ने कुठेही न जाता आणि आपले नाव हे नेहमी गुप्त ठेवले जाते.
त्याची लिंक खाली प्रमाणे
चला तर मग ग्राहकांनो उठा जागे व्हा आणि आपली विघ्ने दूर करणे साठी आपणच प्रयत्न करा.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीला आपले सहकार्य हवे आहे.
बाळासाहेब आवटी,( 98905 85384)
संघटक, मध्य महाराष्ट्र प्रांत
विलास लेले, कोषाध्यक्ष.
(9823132172)