पुणे – येथील लोहगाव विमानतळावरील धावपट्टीचे काम करावयाचे असल्याने एप्रिल व मे महिन्यात १४ दिवस विमानसेवा बंद राहणार आहे. तशी माहिती पुणे विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे. येत्या २६ एप्रिल ते ९ मे या कालावधीत विमानसेवा बंद ठेवली जाणार आहे. या सर्वाची दखल घ्यावी, असे कळविण्यात आले आहे. सद्यस्थितीत नाशिक ते पुणे ही विमानसेवा अलायन्स एअर या कंपनीकडून दिली जात आहे. त्यामुळे ही सेवाही १४ दिवस बंद राहणार आहे.