नवी दिल्ली – एप्रिल महिन्यात तब्बल निम्मा महिना बँक बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकांचे काम असेल तर एप्रिल महिन्यात त्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार एप्रिलमध्ये वेगवेगळ्या झोनमध्ये बँकांचे एकूण १४ दिवस कामकाज बंद असणार आहे. या १४ दिवसांत चार रविवार आणि दोन शनिवारचा समावेश आहे. कारण कोणत्याही महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात.
एप्रिलमधील सुट्टीची तारीख आणि झोन असे…
१ एप्रिल – नवीन आर्थिक वर्षाचा पहिला दिवस : अगरतला, अहमदाबाद, बेलापूर, बेंगलुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगड, कोलकाता, जम्मू, लखनऊ, मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई आणि देहरादून.
२ एप्रिल – गुड फ्राइडे : एंजवल, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चेन्नई, देहरादून, गंगटोक, हैदराबाद, इम्फाल, कानपूर, कोची, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पणजी, पटना, रायपूर, रांची, शिलांग आणि तिरुवनंतपुरम
४ एप्रिल – रविवार – सर्व झोन
५ एप्रिल – बाबू जगजीवन राम जयंती – हैदराबाद विभाग.
१० एप्रिल – महिन्याचा दुसरा शनिवार -सर्व झोन .
११ एप्रिल – रविवार – सर्व झोन
१३ एप्रिल – गुढी पाडवा तसेच तेलगू नवीन वर्ष आणि बैसाखी : बेलापूर, बंगळुरु, चेन्नई, हैदराबाद, इम्फाळ, मुंबई, नागपूर, पणजी आणि श्रीनगर.
१४ एप्रिल – आंबेडकर जयंती व तामिळ नववर्ष : अगरतळा, अहमदाबाद, बेलापूर, बेंगलुरू, भुवनेश्वर, चेन्नई, देहरादून, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इम्फाळ, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, पणजी, पटना, रांची, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरम.
१५ एप्रिल – हिमाचल दिन, बंगाली नववर्ष : अगरतला, गुवाहाटी, कोलकाता, रांची आणि शिमला.
१६ एप्रिल – बोहाग बिहू – गुवाहाटी
१८ एप्रिल – रविवार सर्व विभाग
२१ एप्रिल – रामनवमी, गरिया पूजा: अगरतळा, अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, देहरादून, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनऊ, मुंबई, नागपूर, पटना , रांची आणि शिमला.
२४ एप्रिल – चौथा शनीवार -सर्व विभाग
२५ एप्रिल – रविवार – सर्व विभाग.