मुंबई – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने पुन्हा एकदा चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरला नोटीस बजावली आहे. याशिवाय त्याच्या घरी ज्या पार्टी होतात, त्याचे व्हिडीओ फुटेजदेखील एनसीबीने मागवले आहे. बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणी यापूर्वी देखील करण जोहरला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तसेच धर्मा प्रॉडक्शनच्या एका अधिकाऱ्याला देखील अटक करण्यात आली होती.
याचबरोबर गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या पार्टीतील व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबतही त्याच्याकडे चौकशी करण्यात येणार आहे. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक कलाकार सहभागी झाले होते. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर एनसीबी सातत्याने बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनची चौकशी करत आहे. या पार्टीतील व्हिडिओबाबत करण जोहरने सप्टेंबरमध्ये एक स्टेटमेंट दिले होते. त्यात त्याने आपल्याला, आपल्या परिवाराला आणि धर्मा प्रॉडक्शनला बदनाम करण्याचा हा कट असल्याचे म्हटले होते.