नाशिक – नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या त्रिसदस्यीय मंडळावर नेमणुक झालेले सनदी लेखापाल तुषार पगार यांनी आपल्या नियुक्तीनंतर काही तासातच राजीनामा दिला आहे. या समितीवर असलेल्या दोन सदस्यांनी आज बँकेत येऊन कार्यभार हाती घेतला आहे. या त्रिससदस्यीय मंडळात एसआरए प्रकल्पाचे एम.ए.आरिफ, पुण्याचे सह निबंधक चंद्रशेखर बारी, तिसरे सदस्य तुषार पगार आहे. यातील तुषार पगार वगळता दोन्ही सदस्यांनी आज कार्यभार घेतला. पण, पगार आले नाही. त्यांचा थेट राजीनामा दिल्याचे वृत्त काही वेळाने आले.
त्यांनी याबाबत सहकार आयुक्तांना पत्र पाठवले असून त्यात विश्वास दाखवल्याबद्दल आभार मानले आहे. पण, व्यावसायिक व कौटुंबिक कारणामुळे बँकेला वेळ देऊ शकत नाही असे कारण त्यांनी लिहले आहे.
जिल्हा बँकेतील नोकरभरती व अनियमित खरेदी प्रकरणी दोन वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. पण, या प्रकरणात संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने बरखास्तीला स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठवल्यामुळे आता सहकार विभागाने त्रिसदस्यीय प्रशासकाची नेमणुक केली. पण, त्यातील एक सदस्यांनी कार्यभार हाती घेण्याअगोदरच राजीनामा दिला.