नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोगाने राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी (I) & (II) 2020 लेखी परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. सामायिक परीक्षा असल्यामुळे उमेदवार संरक्षण मंत्रालयांतर्गत असेल्या सेवा निवड मंडळाकडून (SSB) एनडीएच्या अंतर्गत लष्कर, नौदल आणि हवाईदल विभागाच्या अभ्यासक्रमाच्या मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत.निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
सर्व उमेदवारांचे निकाल तात्पुरते आहे. उमेदवारांनी निकाल जाहीर झाल्यापासून भारतीय लष्कराच्या joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर दोन आठवड्याच्या नावनोंदणी करावी. त्यानंतर उमेदवारांना एसएसबी मुलाखतीची केंद्र आणि तारीख कळवण्यात येईल.
निकालासाठी खालील लिंकवर क्लिक करा