उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती असून, त्यांनी जन्म दाखला, शैक्षणिक पात्रता यासंदर्भात आवश्यक प्रमाणपत्रे,अतिरिक्त भर्ती महासंचालनालय, एकीकृत मुख्यालय, संरक्षण मंत्रालय, ( लष्कर )पश्चिम ब्लॉक III, विंग- I, आर के पुरम, नवी दिल्ली -110066 इथे सादर करण्याच्या अधीन असेल. युपीएससी कडे ही कागदपत्रे सादर करायची नाहीत. पत्त्यात बदल असल्यास उमेदवाराने तातडीने वर दिलेल्या पत्यावर लष्कर मुख्यालयाशी संपर्क साधावा.
यूपीएससीच्या https://www.upsc.gov.in. या संकेत स्थळावरही निकाल उपलब्ध आहे. मात्र गुण अंतिम निकालाच्या १५ दिवसानंतर उपलब्ध होतील.
अधिक माहितीसाठी उमेदवार आयोगाच्या सी प्रवेश द्वाराजवळच्या सुविधा केंद्राशी प्रत्यक्ष किंवा 011-23385271/011-23381125/011-23098543 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5 या वेळेत संपर्क करू शकतात.