नवी दिल्ली – राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) आणि नौदल अकादमीच्या प्रथम परीक्षेचे अंतिम निकाल जाहीर करण्यात आले आहेत. एनडीच्या १४५ व्या वर्ष अभ्यासक्रमातील भूदल, नौदल आणि हवाई दल विभागांतील तसेच भारतीय नौदल अकादमीच्या १०७ व्या अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने ६ सप्टेंबर २०२० ला घेतलेल्या लेखी परीक्षा घेतली होती. त्यातील गुण आणि त्यानंतर संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने घेतलेल्या मुलाखतींच्या आधारे पात्र ठरलेल्या ५३३ उमेदवारांची यादी खाली जोडली आहे.
या अभ्यासक्रमांचे वर्ग सुरु होण्याच्या तारखांच्या तपशीलवार माहितीसाठी संरक्षण मंत्रालयाच्या www.joinindianarmy.nic.in,
www.joinindiannavy.gov.in
आणि
या संकेतस्थळांना भेट द्यावी.
या परीक्षांचे निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या
या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी
उमेदवारांनी मंडळाच्या ‘C’ गेट जवळील सुविधा केंद्राला प्रत्यक्ष भेट द्यावी अथवा 011-23385271/011-23381125/011-23098543 या टेलीफोन क्रमांकांवर कोणत्याही कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संपर्क साधावा.