नाशिक – संरक्षण क्षेत्रामधील देशात अग्रभागी असलेल्या एचएएलच्या हजारो कामगारांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मागणी माजी आमदार अनिल कदम आणि कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन केली.
केंद्र सरकारच्या नियमावलीत थोडेच कामगार प्रतिबंधक लस घेण्यास पात्र होत असल्याचे निदर्शनास आल्याने तसे न करता कायमस्वरूपी साडेचार हजार तर कंत्राटी अडीच हजार कामगारांना एकाचवेळी प्राधान्याने कोविड प्रतिबंधक लस देण्याचे प्रयोजन करून नाशिक विभाग एकाच टप्प्यात कोरोनामुक्तीकडे गेल्यास त्याचा फायदा त्यांच्या कुटुंबियांना देखील होणार असल्याने आरोग्य मंत्र्यांनी यावर लवकरच सकारात्मक पाऊले उचलून तातडीने नियोजन करण्याचे सांगितले.यावेळी नाशिक विभाग कामगार संघटनेचे सरचिटणीस सचिन ढोमसे, उपाध्यक्ष जितू जाधव,कमलेश धिंगाणे, संतोष आहेर यांच्या सह इतर कामगार उपस्थित होते.