बीजिंग – लग्नानंतर प्रत्येक युवतीची आई बनण्याची इच्छा असते. आई बनणं त्यांच्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा आनंद असतो. चीनमधील २५ वर्षीय अशीच एका महिला आई बनण्यासाठी प्रयत्न करत होती. टाचेच्या दुखापतीवर उपचारासाठी ती जेव्हा डॉक्टरकडे गेली तेव्हा तिचा एक्स रे काढण्यात आला. तेव्हा ती महिला नसून पुरुष असल्याची बाब उघड झाली.
चीनमध्ये राहणारी २५ वर्षीय महिला गेल्या एक वर्षापासून आई बनण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या टाचेच्या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी तिनं डॉक्टरांकडे एक्स रे काढला. ती महिला नसून पुरुष असल्याची माहिती डॉक्टरांनी एक्स रे पाहिल्यानंतर दिली. तिच्या हाडांचा विकास झाला नाही, असं त्यांनी सांगितलं.
डॉक्टरांनी खुलासा केल्यानंतर महिला गोंधळून गेली. ती महिला नसून पुरुष असल्याची बाब डॉक्टरांना तिच्या गळी उतरवण्यात यश आलं. ती महिला चीनच्या पूर्वेकडील झेजियांग प्रांतातील रहिवासी आहे. तिचं नाव पिंगपिंग आहे. पिंगपिंग २५ वर्षांपासून महिलेच्या रूपात राहते. तिला गर्भाशय आणि अंडाशय नाही, असं तिला डॉक्टरांनी सांगितलं. तिच्यामध्ये पुरुषांचे वाय गुणसूत्र आहेत, जे की पिंगपिंग अनुवांशिक पुरुष असल्याचं सिद्ध होतं.