नवी दिल्ली : एक एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी देशात लसीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून कोरोना लसीची कोणताही तुटवडा भासणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
यावेळी त्यांनी १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकानी लगेच नोंदणी करावी आणि लसीकरण करुन घ्यावे. देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत राज्य आणि केंद्र सरकार कोरोनापासून कसा बचाव करता येईल यावर पूर्ण लक्ष देत असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्वांवर लस हा सर्वात उत्तम मार्ग असून सर्वांनी लसीकरण करणे आवश्यक असल्याचे तज्ञांचे म्हणणे असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी देशात आतापर्यंत ४.७२ कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयामार्फत जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत एकूण ४,७२,०७,१३४ लोकांचं लसीकरण झाल्याचेही ते म्हणाले.