लायन्स क्लब ॲाफ नासिक राॅयल्सचा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला. शपथविधी सोहळा उपप्रांतपाल राजेश कोठावदे यांचे हस्ते तर पदग्रहण समारंभ माजी प्रांतपाल Multiple GLT Coordinator राजेंद्र मुछाळ यांचे हस्ते हाॅटेल ताज मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समारंभाविषयी हा लेख….
नूतन पदाधिकारी म्हणून अध्यक्ष आर्कि राहुल वेढणे, सचिव समीर दुसाणे व खजिनदार भूषण महाजन यांनी पदभार स्विकारला. शरद वाणी, हरीष कुंभारे, नितीन जंगले, चेतन सोनजे, विजय वानखेडे यांचेसह आदी २२ जणांनी नूतन सभासदत्वाची शपथ घेतली.
सदर सोहळ्यात महिला सशक्तीकरण याअंतर्गत गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. कोरोना परिस्थीतीतून बाहेर पडण्यासाठी उन्नती शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले. तसेच कर्करोगावर उपचार घेत असलेल्या ऐका बांधवास रोख मदत करण्यात आली. यावेळेस राॅयल्स क्लबच्या बिझनेस अॅप्लिकेशन ॲपचे उदघाटन करण्यात आले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षणतज्ज्ञ सचिन जोशी यांचा शिक्षक गोरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या क्लबच्या सदस्या रेखा सोनवणे, वंशिका अहिरे व संध्या कोठावदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याचवेळी सखी मंच ने आयोजित केलेल्या स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या योगीता अमृतकार, अनिता येवला, आरती अलई यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळेस मुख्य वक्ता राजेंद्र मुछाल यांनी मनोगतात सांगितले की, You don’t get what you desire, but you will get what you deserve. prove yourself which you select by your own choice. तुम्ही घेतलेल्या जबाबदारीने दुसऱ्यांना inspire करा अथवा बाजूला व्हा (Inspire or expire).
शिक्षकसन्मान पुरस्कारार्थी जोशी यांनी मनोगतात सांगितले की, लायन्स क्लब सारख्या संस्थांनी आता शिक्षकांना ॲानलाईन शिक्षण देण्यासंबधीचे सेमिनार घ्यावेत. तसेच parent as a teacher साठी कार्यशाळा घ्याव्यात.
Cabinet secretary परमानंद शर्मा यांनी क्लबच्या उत्कृष्ट प्रशासकीय कार्यासंबंधी मनोगत व्यक्त केले. उपप्रांतपाल राजेश कोठावदे यांनी leadership skills संदर्भातील नेतृत्व करणाऱ्याने patience, decision making, listening, hearing, communication या विषयांवर मनोगत व्यक्त केले.
अपरिहार्य कारणास्तव समारंभास उपस्थित राहू न शकणारे मल्टीपल कौन्सिल चेअरमन गिरीश मालपाणी, प्रातपाल अभय शास्री, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी विशेष शुभेच्छा संदेश पाठविले. त्याचे वाचन यावेळी करण्यात आले.
नुतन अध्यक्ष राहुल वेढणे यांनी acceptance speech मध्ये कोरोना संकटमय काळात नाविण्यपूर्ण सेवाकार्य करण्यास ध्यास व्यक्त केला. मागील वर्षी मनिष अहिरे यांनी क्लबला उत्कृष्ट नेतृत्व दिल्यामुळे त्यांचा विशेष गौरव नुतन अध्यक्ष राहुल वेढणे यांनी केला. सदर सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष मनिष अहिरे, प्रविण जयकृष्णीया, सतिष अलई यासह नुतन पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले.
सोहळ्यास प्रांत सचिव परमानंद शर्मा, विभागीय अध्यक्ष राजेंद्र पगार, शेखर सोनवणे, रितु चौधरी, रमेश पवार, जितुभाई पटेल, राजु व्यास, नितीन मराठे, अशोक सांवत, प्रशांत कोतकर, सौ पल्लवी वेढणे, सौ वंशीका आहिरे, सौ संध्या कोठावदे, सौ शितल जयकृष्णीया, सौ वैशाली कोतकर, सौ वैशाली वाघ, उमेश वाघ, अनिल अमृतकार, श्रीकांत येवला, समाधान सोनवणे, सारंग सोनजे, संदिप मोरे, विशाल गांधी, तेजस साळुंखे यांचेसह अनेक लायन्स सदस्य उपस्थित होते
सोहळ्याचे ध्वजवंदन तन्मय अमृतकार याने तर सूत्रसंचलन आरती अलई व कोमल जंगले यांनी केले. आभार प्रदर्शन खजिनदार भूषण महाजन यांनी केले.
– लायन्स क्लब ॲाफ नासिक राॅयल्स टीम