नवी दिल्ली – भारत-चीन सीमा तणाव संपुष्टात यावा आणि शांतता कायम राहावी अशी भारताची इच्छा आहे. तसेच, मला सैन्यावर पूर्ण विश्वास आहे, एक इंच जमीनही आम्ही कुणाला देणार नाही असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे.
दसऱ्याच्या पार्श्ववभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग येथील सुकना युद्ध स्मारकात शस्त्र पूजन केले. यावेळी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे उपस्थित आहेत. संरक्षणमंत्री पुढे म्हणाले की,
भारत-चीन सीमा प्रश्नी भारतीय सैन्यावर पूर्ण विश्वास आहे. आजपर्यंत सीमा भागात सैन्याने केलेल्या कामगिरीचे त्यांनी यावेळी कौतुक केले. दार्जिलिंगमधील सुकना वॉर मेमोरिअलमध्ये सैन्याचे मनोबल वाढवताना ते बोलत होते. संरक्षणमंत्री पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या दोन दिवसीय दौर्यावर आहेत.