मुंबई – एक वेळ होती जेव्हा ट्रेनचे तिकीट बुक करण्यासाठी लोकांना रेल्वे स्थानकावर लांबलचक रांगेत उभे राहावे लागायचे. किंवा एजंटला सांगून जास्तीचे पैसे देऊन तिकीट काढून घ्यावे लागायचे. मात्र आता हा इतिहास झाला आहे कारण आता तंत्रज्ञानाने सारे काही सोपे केले आहे.
आता तुम्ही घरबसल्या काही मिनीटांमध्येच तिकीट बुक करू शकता. पूर्वी यासाठी लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा वापर करावा लागत होता, आता तर हे काम मोबाईल अॅपवरूनही शक्य झाले आहे. आपण स्मार्टफोनच्या माध्यमातून तिकीट बुक करण्याची प्रक्रिया जाणून घेऊया…
सर्वांत पहिले आपल्या स्मार्टफोनमध्ये गुगल प्ले स्टोअरमधून IRCTC Rail Connect ऐप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर यात लॉगीन करावे आणि त्यासाठी आपले रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. त्याचाही मार्ग एपवर दिला आहे. एकदा लॉगीन झाले की Plan My Journey प्लान माई जर्नीवर क्लिक करा. याठिकाणी कोणत्या शहरातून कुठे जायचे आहे ते डेस्टिनेशन या कॉलममध्ये सिलेक्ट करावे. त्यानंतर तारीख टाकून सर्च करावे.
सर्चवर क्लिक करताच गाड्यांची यादी तुमच्यापुढे येईल. यातील आपल्या सोयीच्या गाडीवर क्लिक करा. यात कोच आणि सीट सिलेक्ट करण्याचाही पर्याय मिळेल. ट्रेन, कोच आणि सीट सिलेक्ट केल्यानंतर बुक लिहीलेल्या बटणवर क्लिक करा. त्यावरून तिकीटांचे दर कळतील. गो टू पेसेन्जर पर्यायावर क्लिक केल्यानंतर प्रवास करणाऱ्यांची नावे टाका. पेमेंटवर क्लिक करून तिकीट बुक करा. एवढी सोपी ही प्रक्रिया आहे.