नवी दिल्ली – कोरोना लसीकरणासाठी नोंदणीचे काही नियम बदलण्यात आले आहेत. यावेळी लाभार्थी ‘कोविड २.०’ अॅपवर नोंदणी करू शकतील. याशिवाय लसीकरण केंद्रातही नोंदणी केली जाईल. एका मोबाइल नंबरवर चार लोक नोंदणी करू शकतील. मात्र नोंदणी केवळ मोबाईल क्रमांकाद्वारे केली जाईल.
जास्तीत जास्त लोकांना कोरोना लस देण्याची जबाबदारी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनावर सोपविली आहे. यासाठी आशा वार्कर, एएनएम प्रतिनिधी, पंचायत प्रतिनिधी आणि महिला बचत गट सक्रिय केले जाईल. सर्व लसीकरांना एक दुवा असलेला क्यूआर कोड देण्यात येईल जिथून ते लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतील.
तसेच लसीकरण केंद्रांवर देखील नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध असेल. एका मोबाइल नंबरवर चार लोक नोंदणी करू शकतील. पडताळणीनंतर, लस घेण्यासाठी कोणतेही एक ओळखपत्र दाखवावे लागेल, त्यामुळे लस घेताना आधार किंवा मतदार कार्ड असणे महत्वाचे आहे.
तसेच दुसरा डोस हा पहिल्या डोसच्या २९ दिवसानंतर दिला जाईल, संगणक प्रणालीद्वारे त्याची सूचना पाठविली जाईल. आपण आपल्या सोयीनुसार लसीकरण करण्याची वेळ, दिवस आणि ठिकाण निवडू शकता.
अंपग लोकांना प्राधान्याने लस देण्यात येईल, अपंगत्वाच्या काही प्रकारांचा सरकारने समावेश केला आहे. यात मानसिक अपंग (बौद्धिक अपंगत्व किंवा मेंटल रिटार्ड), बहिरेपणा, अनुवांशिक रोग, स्नायूंच्या डिस्ट्रॉफीसह एकाधिक अपंगांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचा यात समावेश आहे. या व्यतिरिक्त ज्यांच्या श्वासोच्छवासावर परिणाम झाला आहे, अशा लोकांनाही लस दिली जाऊ शकते.