नाशिक – एकलहरे प्रकल्पाच्या विषयावर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत व उर्जाराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची राष्ट्रवादीच्या आमदार सरोज आहिरे यांनी मंगळवारी भेट घेतली. या भेटीत आ. आहिरे यांनी सिन्नरच्या प्रकल्पा विषयी मागच्या आठवड्यात जी बैठक झाली त्या बैठकीत जी काही चर्चा झाली. त्यात एकलहरे ६६० मेगावॅट औष्णिक विद्युत प्रकल्प बंद करण्याचा विषय मांडला गेला का ? असा सरळ प्रश्न मांडला. त्यानंतर मंत्री राऊत यांनी सांगितले की, मी त्या बैठकीत नव्हतो, त्या खात्याचा प्रमुख म्हणून नाशिक येथील औष्णिक विद्युत प्रकल्प बंद करण्याचा असा कुठलाही निर्णय मी घेतलेला नाही. हा प्रकल्प बंद करण्याचा असा कुठलाही विचार आता नाही. त्यामुळे जनतेने किंवा त्या परिसरातील लोकांनी प्रकल्पा विषयी कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये.
आमदार सरोज आहिरे यांनी प्रकल्पाबाबत जनतेचा आक्रोश असल्याचे यावेळी सांगितले. या प्रकल्पावर अनेक लोकांचे रोजगार अवलंबून आहे तसेच जवळपास पाच हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह या प्रकल्पावर चालतो. शेतकरी भूमिहीन झाले, या सर्व लोकांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न आहे, बेरोजगारी वाढू नये याची काळजी घेऊन हा प्रकल्प सुरू ठेवावा लागेल अशी विनंती केली. नाशिक पुणे मुंबईत या सुवर्ण त्रिकोणातील हा प्रकल्प किती महत्त्वाचा आहे याबाबत सकारात्मक चर्चा केली.
यावेळी ऊर्जामंत्री राऊत यांनी सांगितले की, येत्या जानेवारी महिन्यात महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये मी नाशिकला येणार आहे तेव्हा स्वतः औष्णिक विद्युत केंद्र एकलहरे येथे भेट देऊन त्या संदर्भात या प्रकल्पा विषयी अजून काय करता येईल याविषयी चर्चा करू असे आश्वासन त्यांनी आ.आहिरे यांना दिले. त्याच बरोबर प्रकल्पग्रस्तांचे जे प्रशिक्षण वर्ग गेल्या जुलै महिन्या पासून बंद आहेत ते वर्ग सूर करण्यात यावे तसेच ऊर्जा निर्मिती विभागाच्या तिन्ही खात्याच्या नोकर भरती सुरू करण्यात यावी अशी विनंती ही आमदार सरोज आहिरे यांनी यावेळी केली.