नाशिक – एकलहरे प्रकल्पग्रस्त कुटुंबातील मुलांना नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नातून एकलहरे येथील २८ मुलांना कायमस्वरूपी नोकरीत समावून घेण्यात आले आहे. त्याबद्दल आज प्रकल्पग्रस्त कुटुंबातील शिष्टमंडळाने आज पालकमंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी दिनेश म्हस्के, तानाजीराव गायधनी, रामदास डुकरे, शंकर धनवटे, प्रशांत म्हस्के, अमोल जाधव, गणेश जाधव, जयराम म्हस्के, सचिन धात्रक, केशव डुकरे, रामकृष्ण म्हस्के, सचिन गोसावी आदी उपस्थित होते.