जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. उपचारासाठी एकनाथ खडसे हे मुंबईकडे निघाले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्यांनी तातडीने कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन खडसे यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वीच रोहिणी खडसे यांनी ट्विट करुन माहिती दिली होती की त्यांना आणि त्यांच्या मुलीला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात आता एकनाथ खडसे यांनाही लागण झाली आहे.