मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात (ईडी) पोहचले आहेत. त्यांची चौकशी सध्या सुरू आहे. ईडीने त्यांना नोटिस बजावली होती. त्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्यामुळे ते हॉस्पिटललमध्ये उपचार घेत होते. आता त्यांना बरे वाटत असले तरी अशक्तपणा मोठ्या प्रमाणात आहे. तरीही ते ईडी कार्यालयात आले आहेत. ३० डिसेंबरला त्यांची चौकशी होणार होती. मात्र, कोरोना नियमामुळे १४ दिवसानंतर ते कार्यालयात हजर झाले आहेत. ईडीला सर्व कागदपत्रे सादर करीत असून सर्वतोपरी सहकार्य करु, असे खडसे यांनी सांगितले आहे.