नवी दिल्ली – भारतीय जीवन बीमा निगम (एलआयसी) ची सर्वात लोकप्रिय असलेली जीवन अक्षय पॉलिसी घेण्याची संधी ग्राहकांना पुन्हा मिळाली आहे. यात एकदा गुंतवणूक केल्यानंतर आयुष्यभर पेन्शन मिळू शकते.
एलआयसीच्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये गुंतवणूक रक्कमेची कोणतीही मर्यादा नाही. कमीत कमी एक लाख रुपयांच्या गुंतवणूकीने ही पॉलिसी सुरू करता येते. या पॉलिसीमध्ये कमीत कमी एक लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर गुंतवणूकदारांवर १२ हजार रुपये वार्षिक पेन्शन मिळते. गुंतवणूकदारांना या पॉलिसीमध्ये वय ३५ वर्षांपासून ते ८५ वर्षांपर्यंत फायदा मिळू शकतो. या पेन्शनची रक्कम प्राप्त करण्यासाठी १० पर्याय उपलब्ध आहेत. या पॉलिसीमध्ये वार्षिक, अर्धवार्षिक, त्रैमासिक आणि मासिक हप्त्याची सुविधा उपलब्धता आहे. यात ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे हप्ता भरणे शक्य आहे. या पॉलिसीमध्ये तीन महिन्यांनंतर कधीही कर्ज (लोन ) सुविधा उपलब्ध होईल.