नाशिक – गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे एकता फ्लॉवर शो २०२०चे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. हा फ्लॉवर शो गुजराथ फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून आयोजित करण्यात आला होता. ८ नोव्हेंबरपर्यंत हा फ्लॉवर शो सुरु असणार आहे. सरदार सरोवर जलाशयातील पर्वतांच्या सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये याची निर्मिती करण्यात आली आहे. अवघ्या ७२ तासांच्या कालावधीत या फ्लॉवर शोची निर्मिती करण्यात आली आहे. नाशिकच्या सचिन ब्राह्मणकर यांनी या फ्लॉवर शोचे डिझाईन केले आहे. फ्लॉवर शोचे अनोखे रुप या निमित्ताने जगासमोर आले आहे. या संपूर्ण प्रोजेक्टचे डिझाईन ब्राह्मणकर यांनी केले आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हे संपूर्ण डिझाईन तयार करण्यात आले आहे. त्यातील बारकावे तसेच फुलांची निवड त्यांचे योग्य वर्गीकरण यासाठी ब्राह्मणकर व त्यांच्या सहकार्यांनी मेहनत घेतली. सध्या जगभरात याची चर्चा होत आहे. निसर्गाच्या अद्भुत संपत्तीचे दर्शन येथे होते. विविध जातीच्या वनस्पती, फुले, पाने आदींचा वापर करून फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून हे काम पूर्ण करण्यात आले. यात नाशिकच्या अल्फा अॅग्रो आणि लँडस्केप सर्व्हिसेसचे सचिन ब्राह्मणकर यांचे डिझाईन असून सायंटिफिक सीडलिंग्ज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांनी वनस्पती व साहित्याचा पुरवठा केला आहे. प्रत्यक्ष कामातील सुसूत्रता आणण्यासाठी अहमदाबादच्या धरती नर्सरी अँड फार्मचे राजुभाई चौधरी यांनी परिश्रम घेतले. सायंटिफिक सीडलिंगचे बिंटु पवार यांनी देखील यात मोठे सहकार्य केले.
बघा या उद्यानाचे हे काही छायाचित्र