मुंबई – बरेचदा आपण बघतो की कार अपघातात एअरबॅग उघडल्यानंतरही चालक गंभीररित्या जखमी झालेला असतो. या जखमा कधीकधी जीवघेण्या ठरतात. खरे तर ही एअरबॅग डोक्याच्या भागाची सुरक्षा करण्यासाठी असते, मात्र एअरबॅग उघडूनही आपल्याला जखम होण्याची शक्यता असते. त्यामुळे काही चुका आवर्जून टाळायला हव्या.
सीट बेल्ट – सीट बेल्ट अत्यंत आवश्यक असतो. सीट बेल्ट हा आपल्याला जागेवर योग्य पोझीशनमध्ये राखतो. विशेषतः ड्रायव्हरची सीट योग्य पोझीशनमध्ये ठेवण्याचे काम सीट बेल्ट करीत असतो. मात्र बेल्ट लावला नाही तर एअरबॅग उघडल्यावर आपले डोगे विंगशिल्ड किंवा डॅशबोर्डवर जाऊन आदळू शकते. त्यातून डोक्याला गंभीर इजा होऊ शकते.
डॅशबोर्ड एक्सेसरीज – लोक बरेचदा सजावटीसाठी मेटलच्या एक्सेसरीज कारमध्ये लावतो. पण अपघात झाल्यास याच वस्तूंवर आदळून आपल्याला गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे डॅशबोर्ड एक्सेसरीज लावण्याचे टाळलेच पाहिजे.
सिटींग पोझिशन – अपघात झाला तर सिटींग पोझिशन आपल्याला सुरक्षित ठेवण्यात मोलाची भूमिका बजावत असते. सिटींग पोझीशनचा अँगल जास्त आहे तर ते धोकादायक ठरू शकते. कम्फर्टच्या नादाला लागून जीवाशी खेळ करू नका.