नवी दिल्ली – टेलिकॉम कंपनी एअरटेलने ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर आणली आहे. ही एक प्रमोशन ऑफर असुन यात विना जाहिरात युट्यूब वापरता येणार आहे. कोणत्याही प्रकारच्या जाहिराती विना आता एअरटेल ग्राहकांना युट्युब वापरता येणार आहे. या अंतर्गत प्रीमियम ग्राहकांसाठी प्रतिमहा १२९ रुपये तर तीन माहिन्यासाठी ३९९ रुपये आकारले जाणार आहे.
ही प्रीमियम सुविधा २२ मे २०२१ पर्यंत ग्राहकांना वापरता येणार आहे. एअरटेलतर्फे प्रथमच विनाजाहिराती युट्युबची सुविधा देण्यात आली आहे. ज्या ग्राहकांनी अजूनही या सुविधेचा लाभ घेतला नाही अशा सर्व ग्राहकांना याचा फायदा घेता येणार आहे. यासाठी केवळ गुगल अकाउंट असणे आवश्यक आहे. Airtle thanks app च्या मदतीने ही सुविधा वापरता येते. याद्वारे thanks reward च्या पर्यायाद्वारे अतिशय सोप्या पद्धतीने ही सुविधा वापरता येते.