देवळाली कॅम्प :- लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ आलेली असतांना यादरम्यान त्रस्त झालेल्या जनतेला वीजबिलात वाढ करून वीजबिले भरायला भाग पाडणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत, ऊर्जा सचिव तसेच महावितरणचे कार्यकारी संचालक यांच्या विरोधात फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल करण्याची मागणी भगूर देवळाली कॅम्प मनसेच्या वतीने करण्यात आली.
सर्वसामान्य जनतेला येणारे वीजबिले पाहून अनेकांचे डोळे विस्फारत असून अवाच्या सव्वा आकारण्यात आलेल्या बिलांबाबत मनसेसह अन्य काही प्रमुख पक्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे वीजबिलाबाबत तक्रारी सादर केल्या होत्या. त्यानंतर सरकारने ‘ वीजबिलाबाबत दिलासा देऊ ‘असे आश्वासनही दिले मात्र सरकार व वीज वितरण कंपनीकडून अद्यापही वीज बिल कमी न केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येथील मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष खंडेराव मेढे यांच्या नेतृत्वाखाली मनसे शहर अध्यक्ष गोकुळ जाधव, भगूर शहर अध्यक्ष कैलास भोर, भास्कर चौधरी, दत्ताजी डावरे, सचिन गोडसे, जयप्रकाश धुर्जड, नितीन काळे, सुधीर वाजे,राजेश गायकवाड, संतोष सोनवणे, प्रमोद कुंवर, निलेश साळवे, नवनाथ झोंबाड, विकास गोरे, विजय गव्हाणे,संजय गीते,संदीप चौधरी,जॉन डेनियल,धनंजय शिंदे,ज्ञानेश्वर जाचक,शाम देशमुख,अक्षय गोडसे आदींच्या शिष्ट मंडळाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमूख यांची भेट घेत हे निवेदन सादर केले आहे. या निवेदनात वीजबिलाच्या बाबतीत झालेल्या बैठकीचा उहापोह देखील करण्यात आला आहे.