मुंबई – राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे कोरोना बाधित झाले आहेत. तशी माहिती त्यांनीच ट्विटरद्वारे दिली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी. सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. राऊत यांच्या रुपाने राज्याच्या मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची बाधा झाली आहे.