मुंबई – औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर करण्याचा मुद्दा पेटत असतानात आता उस्मानाबाद शहराचे नामांतर पुढे आले आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) केलेल्या ट्विटमध्ये उस्मानाबाद शहराचा उल्लेख धाराशीव असा करण्यात आला आहे. काँग्रेसने यापूर्वीच औरंगाबादच्या नामांतराला ठाम विरोध केला आहे. आता उस्मानाबादचाही मुद्दा पुढे आल्याने महाविकास आघाडीत मतभेद वाढण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, नामांतरावरुन यापुढील काळात राजकारण वेग घेण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1349346139544276992