नाशिक – देवळाली कॅन्टोंमेट बोर्ड कर्माचऱ्यांना पगार वेळेवर मिळत नसलयाने कॅन्टोंन्मेट एम्प्लॉईज युनियन कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिता लावून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. युनियनचे अध्यक्ष एम. आय. खान यांनी सांगितले की कॅन्टोंमेट बोर्डाकडून डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी आणि क्लार्क यांना गेल्या काही महिन्यांपासून वेळेवर पगार दिला जात नाही. दर महिन्याला १० ते १५ दिवस उशिरााने पगार मिळत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. कर्जाचे हफ्ते वेळेवर न गेल्याने वित्तीय संस्था दंड वसुली करीत आहेत. त्यामुळे कर्माचऱ्यांना विनाकारण भुर्दंड सोसावा लागत आहे. कोरोनाच्या काळात डॉक्टर, नर्स यांनी जिवाची पर्वा न करता देवळालीची व देशाची सेवा केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपले दायित्व स्विकारत सेवा देत आहेत. असे आसताना कर्माचऱ्यांचा पगार उशिरा का होत आहे, असा प्रश्न खान यांनी विचारला आहे. सरकार व कॅन्टॉन्मेंटने वेळएवर पगार करावा, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली आहे.