मुंबई – विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या निलम गो-हे यांची बिनविरोध निवड झाली. भाजपातर्फे या निवडणुकीवर आक्षेप घेण्यात आला होता. पण, तो फेटाळण्यात आला.
सोमवारी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या निवडणुकीची घोषणा विधान परिषदेत केली होती. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा अशा सूचना सभागृह नेते अजित पवार यांनी केल्या होत्या. विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर आणि अन्य भाजपा सदस्यांनी ही निवडणूक पुढे ढकलण्याची आग्रही मागणी केली होती. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर मंगळवारी ही निवडणुक झाली. भाजपने यावर आक्षेप घेतला. उच्च न्यायालयात या निवडणुकीसंबधात याचिका दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. पण, सभापती निंबाळकर यांनी उच्च न्यायालयाने यांसर्दभात काही कळवले नसल्याचे सांगितले.