नाशिक – राज्यसभेत शपथ ग्रहण करत असताना उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या घोषणेवर उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध भागातून “जय भवानी, जय शिवाजी” अशा आशयाचे दहा हजार पत्र पाठविण्यात आली.
राज्यसभेत नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधी प्रसंगी उदयनराजे भोसले यांनी जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा दिल्यानंतर सभापती तथा उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी घोषणेवर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना समज दिली व हि घोषणा रेकॉर्डवरून काढण्याचे आदेश दिले. यामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या उपराष्ट्रपतीच्या निषेधार्थ राज्यभरातून “जय भवानी, जय शिवाजी” अशा आशयाचे वीस लाख पत्र पाठविण्याचा निर्णय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी घेतला. त्या अनुषंगाने नाशिक शहरातील विविध भागातून “जय भवानी, जय शिवाजी” अशा आशयाचे दहा हजार पत्र टपाल पेटीत टाकून उपराष्ट्रपतीना पाठविण्यात आली.
याप्रसंगी कार्याध्यक्ष चिन्मय गाढे, बाळासाहेब गीते, योगेश निसाळ, मकरंद सोमवंशी, राहुल कमानकर, राहुल तुपे, संतोष भुजबळ, सत्यम पोतदार, हर्षल चव्हाण, प्रज्योत सूरवाडकर, कृष्णा काळे, रविंद्र शिंदे, सोनु वायकर, करण आरोटे, हरीश महाजन, शेखर घोरपडे, अक्षय परदेशी, स्वप्नील सोनवने, नितीन अमृतकर, मोनु शर्मा, अविनाश मालुंजकर, वैभव तुपे, किरण सूर्यवंशी, चेतन साळवे, गणेश शिंदे, आकाश गवारी, सचिन महाजन, वैष्णव पवार, सागर खळे, रोहित जाधव आदींसह कार्यकर्ते उपास्थित होते.