नाशिक – राज्यसभेत शपथ ग्रहण करत असताना उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या घोषणेवर उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध भागातून जय भवानी, जय शिवाजी ही घोषणा लिहून दहा हजार पत्र पाठविण्यात आली. या पत्राबाबत बोलतांना खैरे यांनी सांगितले की, राज्यसभेत नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधी प्रसंगी उदयनराजे भोसले यांनी जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा दिल्यानंतर सभापती तथा उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी घोषणेवर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना समज दिली व ही घोषणा रेकॉर्डवरून काढण्याचे आदेश दिले. यामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाला. त्यामुळे त्यांच्या निषेथार्त ही पत्रे पाठविण्यात आली.