नाशिक : जिल्ह्यातील ९ हजार ७७१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २ हजार ४८४ रुग्णांवर उपचार सुरु असून उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये १६६ ने रुग्ण संख्या कमी झाली आहे. आत्तापर्यंत ४७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १५६, चांदवड ४९, सिन्नर १११, दिंडोरी ४६, निफाड १२१, देवळा ६९, नांदगांव ६७, येवला २४, त्र्यंबकेश्वर १६, सुरगाणा १९, पेठ ००, कळवण ०२, बागलाण १९, इगतपुरी १०१, मालेगांव ग्रामीण २९ असे एकूण ८२९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ५७७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ७५ तर जिल्ह्याबाहेरील ०३ असे एकूण २ हजार ४८४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १२ हजार ७२७ रुग्ण आढळून आले आहेत.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण ११३, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २५६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८४ व जिल्हा बाहेरील १९ अशा एकूण ४७२ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.