नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत सोमवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ९ हजार ०३५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत २ हजार ६७० रुग्णांवर उपचार सुरु आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २१८ ने रुग्ण संख्या कमी झाली आहे. आत्तापर्यंत ४५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १८७, चांदवड ५३, सिन्नर १४०, दिंडोरी ४७, निफाड १४१, देवळा ४८, नांदगांव ८२, येवला ३७, त्र्यंबकेश्वर १७, सुरगाणा १४, पेठ ०३, कळवण ०२, बागलाण ३९, इगतपुरी ७२, मालेगांव ग्रामीण ३८ असे एकूण ९१९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ६५८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ८६ तर जिल्ह्याबाहेरील ०७ असे एकूण २ हजार ६७० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १२ हजार १६२ रुग्ण आढळून आले आहेत.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण १०७, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २४७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८४ व जिल्हा बाहेरील १९ अशा एकूण ४५७ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– १२ हजार १६२ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ९ हजार ०३५ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले २ हजार ६७० पॉझिटिव्ह रुग्ण.
(वरील आकडेवारी आज सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)