क्वालालंपूर – मित्र देश असलेल्या मलेशियाने पाकिस्तानला जबर दणका दिला आहे. पाकिस्तानातील डबघाईला आलेल्या आर्थिक स्थितीमुळे जागतिक पातळीवर पाकिस्तानला आणखी एका मोठा नाचक्कीला सामोरे जावे लागले आहे. पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी असलेल्या पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचं बोईग विमान मलेशियाने जप्त केले आहे. या विमानातून प्रवाशांनाही उतरविण्यात आले आहे. यासंदर्भात पाकिस्तानी माध्यमांनीच वृत्त दिले आहे.
पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानने मलेशियाकडून बोईंग हे विमान भाड्याने घेतले. उधारीचे हे पैसे मोठ्या प्रमाणात थकले. तसेच, पाकिस्तान पैसे देण्याचे नावच घेत नव्हता. त्यामुळे मलेशियाने अखेर कठोर पाऊल उचलले. क्वालालंपूर विमानतळावर विमान उड्डाणाची तयारी करीत असतानाच मलेशियाने हे विमान जप्त करण्याचा निर्णय घेतला. या विमानातील प्रवाशांना उतरवून देण्यात आले आहे. या निर्णयाचे मोठे पडसाद पाकिस्तानात उमटत आहेत. मलेशियाने एकतर्फी निर्णय घेतला असून तो योग्य नसल्याचे पाकिस्तानी इंटरनॅशनल एअरने म्हटले आहे.
https://twitter.com/Official_PIA/status/1349985127758258176