नाशिक – केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आज उद्योगांना चालना देणारा अर्थसंकल्प जाहीर केला, हा अर्थसंकल्प सर्व सामन्यापासून, उद्योग व व्यापारी वर्गासाठी भविष्यात एक नवीन ऊर्जा घेऊन येणारा अर्थसंकल्प असल्याने आजच्या अर्थसंकल्पाचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत असल्याचे इंडियन आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सचिव आशिष नहार यांनी सांगितले.
विशेषतः नाशिक शहराच्या विकासाला अधिक वेगवान करणाऱ्या नाशिक मेट्रो प्रोजेक्ट साठी केंद्र सरकारकडून २०९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, नाशिक जिल्ह्यासाठी निओ मेट्रो प्रकल्पास नॅशनल प्रोजेक्ट म्हणून जाहीर केल्याने अनेक नवीन उद्योग आपली गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. तसेच हा प्रकल्प सर्व सामन्यासाठी परवडणारा असल्याने लघुउद्योगापासून सर्वानाच याचा फायदा घेणे सहज शक्य आहे. भविष्यात नाशिक जिल्ह्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त होणार आहे. त्याच बरोबर रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नाशिक हे दत्तक घेण्याचे जे अश्वासन दिले होते. त्याचे आज खऱ्या अर्थाने मुहूर्तस्वरूप येताना दिसत आहे. इज ऑफ डुइंग बिझनेस साठी अनेक धोरणात्मक पावले उचल्यामुळे नवीन उद्योगांनी याचा फायदा उचलणे फारच महत्वाचे आहे.