मंगळवार, जुलै 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होणार; उद्योगमंत्र्यांची ग्वाही

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 6, 2020 | 4:33 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
occigen

मुंबई – राज्यातील कोरोनाची स्थिती हळूहळू सुधारत असून पुढील पंधरा दिवसांत उद्योगांना लागणारा ऑक्सिजन टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्याचे संकेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिले. दरम्यान, करोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता पडू दिली जाणार नाही, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑक्सिजन पुरवठादार व उद्योजक यांच्यासोबत ऑनलाइन बैठक झाली. यावेळी उद्योगांना जाणवणाऱ्या ऑक्सिजन टंचाईवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी एमआयडीसीचे सीईओ पी. अन्बलगन, उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, गॅस असोशिएशनचे अध्यक्ष साकेट टिकू यांसह उद्योजक उपस्थित होते.

राज्य शासनाने महिनाभरापूर्वी कोविड रुग्णांसाठी ८० टक्के ऑक्सिजन राखीव ठेवण्याबाबत आदेश काढले. यामुळे उद्योगांना ऑक्सिजनची मोठी टंचाई जाणवत आहे. असे असले तरी महिनाभराच्या कालावधीत कोरोनाची स्थिती सुधारत चालली आहे. त्यामुळे रुग्णालयाप्रमाणे उद्योगांनाही ऑक्सिजन सुरू राहण्यासाठी आढावा घेतला जाईल. आरोग्य विभागाचा ऑक्सिजन पुरवठा अविरत ठेवून उद्योगांना देखील मुबलक ऑक्सिजन पुरविण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना देसाई यांनी केल्या.

राज्यातील उद्योगांना ८७० मेट्रिक टन प्रतिदिन ऑक्सिजनची गरज आहे. त्यापैकी ६०० मेट्रिक टन ऑक्सिजन उद्योगांना लागतो. राज्यात सध्या एक हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. नवीन उद्योगांतून पाचशे मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होऊ शकते. आपली उत्पादन क्षमता १३०० मेट्रीक टन इतकी आहे. त्यामुळे उद्योगांनी ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रयत्न करावा, अशी सूचना देसाई यांनी केली. दरम्यान, कोरोना रुग्णांची गरज जसजशी कमी होईल, तसतशी उद्योगांसाठी ऑक्सिजनची उपलब्धता वाढेल. मात्र, या क्षणी प्राधान्य रुग्ण उपचारांनाच देण्यात येत आहे. ते प्राधान्य कायम राहील, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पाच तासात केव्हाही द्या परीक्षा; ८० टक्क्याहून अधिक प्रतिसाद

Next Post

नाशिकच्या कुपोषणप्रश्नी राज्यपालांकडून चिंता

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
governor meeting 1140x570 1

नाशिकच्या कुपोषणप्रश्नी राज्यपालांकडून चिंता

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी मदतीसाठी संकोच करू नये, जाणून घ्या, बुधवार, २३ जुलैचे राशिभविष्य

जुलै 22, 2025
Novha Merrytime

सागरी शिक्षण क्षेत्रात मुक्त विद्यापीठाचा प्रवेश…या अकादमी सोबत सामंजस्य करार

जुलै 22, 2025
kanda onion

केंद्राच्या कांदा खरेदीला या तारखे पर्यंत मुदतवाढ मिळावी….मुख्यमंत्र्यांना किसान मोर्चाचे पत्र

जुलै 22, 2025
cbi

परीक्षा पेपरफुटी प्रकरण…आठ माजी रेल्वे कर्मचाऱ्यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

जुलै 22, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

५ वर्षांसाठी २५ हजार कोटींची तरतूद…अशी आहे कृषीसमृद्ध योजना

जुलै 22, 2025
amit shah11

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह या तारखेला राष्ट्रीय सहकार धोरण करणार जाहीर…

जुलै 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011