पंडित दिनेश पंत
यंदा दीपावली मध्ये पाडवा व भाऊबीज एकाच दिवशी आलेली आहे. असा योग दुर्मिळ आहे.
दिवाळी पाडवा
दीपावली पाडवा म्हणजे पती-पत्नीने एकमेकांचा सन्मान करायचा दिवस याला बलिप्रतिपदा असे म्हणतात. पुराणात महान दानशूर राजा बली त्याला वामन रूप विष्णूने दिलेल्या आशिर्वादामुळे आजचा दिवस बलिप्रतिपदा म्हणून ओळखला जातो..
भाऊबीज
मृत्यू देवता यम याची बहिण तिच्या घरी बरेच दिवसानंतर यमाचे जाणे झाले. त्यावेळी औक्षण केल्यानंतर यमाने बहिणीच्या औक्षणच्या तबकामध्ये भेटवस्तू देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी यमाचा बहिणीने त्याला सांगितले की मला स्वतःला कोणतीही भेटवस्तू नको. परंतु आजचा भाऊबीजेच्या दिवशी जी बहीण भावाला ओवाळेल त्या भावाला तू अपमृत्यु येऊ देऊ नकोस, असे वचन तिने घेतले. तेव्हापासून भाऊबीजेला भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना बहिणीकडून केली जाते, अशी पुराण कथा सांगितली जाते.
नूतन विवाह झालेल्या जावई सुनेचा मान-सन्मान तसेच नूतन व्याही विहिणी यादेखील लग्नानंतरची पहिली दिवाळी एकमेकांचा भेटवस्तू देऊन सन्मान करतात. तर या पाडव्यानिमित्त पत्नी आपल्या पतीला कणकेच्या दिव्याने औक्षण करते. काही कुटुंबांमध्ये घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान पाडव्यानिमित्त केला जातो.
मुहूर्त
दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या दिवशी औक्षण करण्यासाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही.
सर्व वाचकांना पाडवा व भाऊबीजेच्या शुभेच्छा….