मुंबई – राज्यात एसटीची वाहतूक पूर्ण क्षमतेनं चालवण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला असून, त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या २० ऑगस्टपासून राज्यात सामाजिक अंतर राखून क्षमतेच्या ५० टक्के आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यात आली होती.
गुजरात आणि कर्नाटक राज्यात शंभर टक्के प्रवासी वाहतूक सुरु केल्याच्या धर्तीवर राज्यातही महामंडळाच्या बसेसद्वारे पूर्ण आसन क्षमतेनं सुरु करायला महाव्यवस्थापक वाहतूक यांनी मंजुरी दिली आहे.
प्रवास करताना प्रवाश्यांनी मास्क लावणं आणि सॅनिटायझरचा वापर करणं, तसंच बसेस पूर्णपणे निर्जंतूक करुनच मार्गस्थ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
एसटी महामंडळाने दिलेली माहिती अशी