मुंबई – मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (१० ऑगस्ट) सेनेच्या सर्व आमदारांची बैठक घेतली. सर्व आमदारांचे काय म्हणणे आहे, त्यांच्या तक्रारी व सूचना काय आहेत हे त्यांनी जाणून घेतले. सेनेचे आमदार रवींद्र वायकर यांच्याकडे महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. सेना आमदारांच्या विविध कामांचा पाठपुरावा हा वायकर हे करतील. त्यासाठी मुख्यंत्री कार्यालयात ते सक्रीय राहतील. सेना आमदार त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील कामांसाठी आग्रही आहेत. या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी वायकर हे कटीबद्ध राहतील, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. ऑनलाईन झालेल्या या बैठकीला सर्व आमदार उपस्थित होते.