नाशिक – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा, आरोग्य यंत्रणा यांच्या प्रयत्नातून नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. सद्यस्थितीत उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये घट होतांना दिसत आहे. विभागातून आजपर्यंत 2 लाख 74 हजार 632 रुग्णांपैकी 2 लाख 67 हजार 230 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 2 हजार 237 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत विभागात 5 हजार 165 रुग्णांचा मृत्यु झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.30 आहे, तर मृत्युदर 1.88 टक्के इतका आहे. अशी माहिती आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली आहे.
नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये 12 लाख 71 हजार 653 अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी 2 लाख 74 हजार 632 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच विभागात 5 हजार 055 व्यक्ति होम क्वारंटाईन तर 178 व्यक्ति संस्थात्मक क्वारंटाईन असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गंडाळ यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.23 टक्के
नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 18 हजार 513 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 1 लाख 15 हजार 242 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 1 हजार 197 रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.23 टक्के इतके आहे. आजपर्यंत 2 हजार 074 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
जळगांव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.72 टक्के
जळगांव जिल्ह्यात आजपर्यंत 57 हजार 780 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 55 हजार 890 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 522 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.72 टक्के इतका आहे. आजपर्यंत 1 हजार 368 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
धुळे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.52 टक्के
धुळे जिल्ह्यात आजपर्यंत 14 हजार 985 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 14 हजार 464 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 130 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.52 टक्के इतके आहे. आजपर्यंत 391 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.16 टक्के
अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत 73 हजार 337 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 71 हजार 993 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 227 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.16 टक्के इतका आहे. आजपर्यंत 1 हजार 117 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.24 टक्के
नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत 10 हजार 17 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 9 हजार 641 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 161 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.24 टक्के इतके आहे. आजपर्यंत 215 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.